वर्धा,
Adhik Maas श्रीक्षेत्र महाकाली धामतीर्थ, महाकाली येथे अधिक अमावस्या व पंधरवाडी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पं. शंकरप्रसाद व शिवकुमारी अग्निहोत्री यांच्या हस्ते त्रिदेवींचे अष्टांग पूजन होम हवन करण्यात आले.
यावेळी पं. अग्निहोत्री म्हणाले की, पालनकर्ता विष्णूचे दहा प्रमुख अवतार आहेत. हिंदू धर्मग्रंथ भागवतपुराणानुसार, सतयुगापासून कलियुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार दशावतार स्वरूपात प्रसिद्ध आहेत. मत्स्य : अवतारात प्रलयकाळी जेव्हा सृष्टीचा विनाश होत होता, तेव्हा भगवान विष्णूने माशाच्या रुपात अवतार घेतला. या अवताराचा मुख्य उद्देश सतकर्मांचे रक्षण करणे आणि वेदांचे संरक्षण करणे होता. कूर्म : जेव्हा देव आणि दानव समुद्रमंथन करत होते तेव्हा मंथन करण्यासाठी पर्वत फिरेल यासाठी भगवान विष्णू कासवाच्या रुपात अवतार घेतला. कूर्म अवताराने समुद्रमंथनायोग्य पर्वताचा पाया बनवून देवांना अमृत प्राप्त करण्यास मदत केली. वराह : प्रलयकाळी पृथ्वी पाताळात जात होती. तेव्हा विष्णू वराहाच्या रुपात अवतार घेतला आणि आपल्या दातांवर पृथ्वीला सुरक्षित ठेवली. नरसिंह : जेव्हा हिरन्यकश्यप नामक अत्याचारी राजा स्वतःला देव म्हणवत होता आणि आपल्या भत प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा विष्णू अर्धमानव अर्धसिंह रुपात (नरसिंह) अवतार घेतला. वामन : जेव्हा बलिराजा नामक राजा संपूर्ण त्रिवेईवर अधिकार करून अधर्माची वाढ करत होता तेव्हा भगवान विष्णूने ब्राह्मण रुपात (वामन) अवतार घेतला. परशुराम : जेव्हा पापी आणि दुराचारी राजे धर्माची हानी करत होते तेव्हा भगवान विष्णू ब्राह्मण रुपात जन्मलेला योद्धा अवतार घेतला. राम : जेव्हा रावण नामक अत्याचारी राजा धर्माची हानी करत होता आणि सत्यरचनेचा नाश करत होता तेव्हा विष्णू मर्यादा पुरुषोत्तम रुपात (राम) अवतार घेतला. कृष्ण : जेव्हा कंस आणि कौरव नामक अत्याचारी राजे धर्माची हानी करत होते तेव्हा विष्णूने १६ कलांच्या पूर्ण अवतार रुपात (कृष्ण) अवतार घेतला. बुद्ध : जेव्हा संसारात क्रोधाची आणि अधर्माची वाढ होत होती तेव्हा विष्णू क्षमा, नील आणि शांतीच्या रुपात (गौतम बुद्ध) अवतार घेतला. बुद्ध अवताराने संसारास शांतीचा मार्ग दाखवून अधर्माचा नाश करून धर्मसंस्थापन केली. कल्की : कलियुगाच्या अंतात प्रकट होणारा आहे अशी भविष्यवाणी शास्त्राने करीत आहे. कल्की अवताराने अवतार धरून सृष्टीचा संहार करून नवीन सतयुग सुरू करेल आणि धर्मसंस्थापन करेल. कल्की अवतार हा अद्याप प्रकट झाला नाही, तो भविष्यात प्रकट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.