आ. संजय भेड़े यांची प्राचीन श्री शिव मंदिराला सदिच्छा भेट

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
नागपूर,
mla sanjay bhede नवनियुक्त विधान परिषद सदस्य तथा नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेड़े यांनी बेलिशॉप रेल्वे कॉलनी येथील जागृत प्राचीन श्री शिव मंदिराला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी मंदिरातील उपस्थित भक्तगण व सदस्यांशी आत्मीय संवाद साधला. विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर भेड़े यांनी प्रथमच या प्राचीन व जागृत मंदिरात दर्शन घेतले. मंदिर परिसरात आगमन होताच नर्व स्टिम्युलेशन थेरपिस्ट व जलयोद्धा डॉ. प्रवीण डबली यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.
 
mla sanjay bhede
 
यावेळी नवनीत सिंह तुली (सीएमडी, गुरुनानक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), डॉ. संजय मालवीय, सी. प्रकाश राव (गुंडुराव) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच गुड्डू तिवारी, मनीष नायडू, जय राठोड, गुरुनाथ पटनायक, सिन्नू पटनायक, कृष्णा, विजय, प्रेमलाल यादव, गणेश कोटुलवार, पं. राजेश द्विवेदी आणि श्रीकांत रॉय यांचीही उपस्थिती होती.
 
संजय भेड़े यांनी मंदिरात विधिवत पूजा-अर्चना केली तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामे व धार्मिक उपक्रमांचे कौतुक केले. मंदिराच्या पुढील कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते आणि सर्वांनी या सदिच्छा भेटीचे स्वागत करत ती प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
सौजन्य: प्रवीण डबली, संपर्क मित्र