वाशीम,
Washim Local Crime Branch जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षात पोलीसांनकडुन धडक मोहिम राबवून गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच मोटार सायकल चोरी करणारे आरोपीचा शोध घेवुन अटक करण्यात आले आहे.
१६ जून रोजी ग्राम शेलु खडसे येथील रहिवाशी सतिष गौतम तुरेराव हा सायकल चोरी चोरी करण्याकरीता आला असल्याबाबत गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखा, वाशीमच्या पथकाला मिळाली. त्यावरुन स्थागुशा चे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी तात्काळ सपोनि योगेश धोत्रे यांचे सोबत एक टिम तयार करुन आरोपी शोध करीता वाशीम शहरात रवाना केले. वाशीम येथील अकोला नाका येथे सतिष गौतम तुरेराव हा मोटार सायकल चोरण्याचे उद्देशाने उभा आहे अश्या माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखा वाशीमच्या टिम तात्काळ अकोला नाका गाठुन आरोपी पळून जाण्याचा तयारीत असतांना मोठ्या शिताफिने त्यास पकडुन ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने ग्राम वांगी येथुन फेब्रुवारी महिन्यात एक मोटार सायकल प्लसरचोरी केली असल्याचे सांगीतले. त्याचे कडुन बजाज कंपनीची प्लसर मोटार सायकल किंमत ५० हजार रुपये हस्तगत केली.
पोलिस स्टेशन ग्रामीण येथे सदर मोटार सायकल चोरीचा गुन्हा नोंद असून, आरोपीस पुढील तपास कामी पोलिस स्टेशन वाशीम ग्रामीण च्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी कडुन जिल्ह्यात चोरी गेलेल्या आणखी मोटार सायकल मिळण्याची शयता आहे.