भवन्सची शरण्या ठरली खो-खोची ‘सामनावीर’

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
नागपूर,
mp sports festival 2026 खासदार क्रीडा महोत्सव २०२६ अंतर्गत आयोजित नागपूर शहरस्तरीय १६ वर्षांखालील खो-खो स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या वतीने महिला महाविद्यालय, नंदनवन येथील क्रीडांगणावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
 
mp sports festival 2026
 
या स्पर्धेत शहरातील विविध शाळा आणि क्रीडा मंडळांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला. मुलींच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत सिव्हिल लाईन्स येथील भवन्स विद्या मंदिरची विद्यार्थिनी शरण्या राहुल पेंडके हिने विशेष यश संपादन केले. तिच्या उल्लेखनीय खेळाच्या जोरावर तिला खासदार क्रीडा महोत्सव २०२६ तर्फे २,५०० रुपयांचा धनादेश तसेच सामनावीर (Player of the Match) पुरस्कार प्रदान करण्यात आला. शरण्याच्या यशामागे प्रशिक्षक वैभव कुभंरे आणि प्रेम राखाडे यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या योगदानाचीही यावेळी प्रशंसा करण्यात आली.
 
शरण्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भवन्स विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका लीना वर्गीस, उपमुख्याध्यापिका कृष्णा कन्नन तसेच क्रीडा विभाग प्रमुख कवलजीतसिंग राजपूत यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मान्यवर, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.