एनसीसी छात्र सैनिकांना ऑबस्टकल क्रॉसिंग कोर्स प्रशिक्षण

नागपूर विभागातील छात्र सैनिकांचा समावेश

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
देवळी,
NCC स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयातील एनसीसी मैदानावर ८ ते १७ जून दरम्यान अडथळा पार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात नागपूर विभागातील ८ एनसीसी बटालियनच्या ५० छात्र सैनिकांनी भाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले.
 

NCC Obstacle Crossing Training Nagpur, Devli NCC Camp News 
सैन्य प्रशिक्षणाचा सराव व त्यात प्रावीण्य प्राप्त व्हावे म्हणून एनसीसीच्या राष्ट्रीय कार्यालयातर्फे थलसेना कॅम्पचे आयोजन राष्ट्रीय स्तरापर्यंत करण्यात येते. प्रावीण्य प्राप्त करणार्‍या छात्र सैनिकांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होते. यात प्रत्येक एनसीसी बटालियन मधून निवडक छात्र सैनिकांना दहा-दहा दिवसांचे सहा निवड शिबिरात आपले कौशल्य दाखवावे लागते आणि NCC  शेवटी उत्कृष्ट छात्र सैनिकांना दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय शिबिराकरिता निवडले जातात.प्रशिक्षण लेफ्टनंट कर्नल जीसांतो यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन मोहन गुजरकर, सुबेदार कृष्णाराम, हवालदार सतीश पुरकर व हवालदार गंगाधर जंगले यांच्या नेतृत्वात देण्यात आले.