शस्त्रक्रियेदरम्यान हलगर्जीपणा आला डॉक्टरच्या अंगलट

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
हिवरासंगम, 
negligence-by-the-doctor-during-surgery : गर्भवती महिलेवर उपचारात हयगय केल्याप्रकरणी पुसद येथील महिला डॉक्टरसह इन्शुरन्स कंपनीला यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने चपराक दिली आहे. तक्रारदार महिलेला 4 लाख रुपये 8 टक्के व्याजासह देण्यात यावे, असा आदेश दिला आहे. भरपाईची रक्कम संयुक्तरित्या किंवा वैयक्तिक द्यायची आहे.
 
 
ytl
 
महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील तृप्ती कपिल कदम यांनी दाखल केलेल्या प्रकरणात पुसद येथील अन्नपूर्णा चेस्ट हॉस्पिटल अँड मॅटरनिटी होमच्या डॉ. प्रणिता संतोष रेवणवार आणि दि इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला ग्राहक आयोगाच्या आदेशाने दणका बसला आहे.
 
 
तृप्ती कदम यांच्यावर डॉ. प्रणिता रेवणवार यांनी शस्त्रक्रिया केली. गर्भाशयातील सदोष गर्भ काढून टाकण्यासाठीची ही शस्त्रक्रिया होती. या शस्त्रक्रियेनंतर सहा दिवसांनी त्यांना वेदना सुरू झाल्या. त्यावेळी त्यांनी डॉ. रेवणवार यांच्याशी संपर्क केला. मात्र त्यांनी बाहेरगावी असल्याचे सांगून उपचारास असमर्थता दर्शविली.
 
 
त्यामुळे तृप्ती कदम यांनी हदगाव येथील एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केलेल्या सोनोग्राफीत तृप्ती कदम यांच्या गर्भ नलिकेत गर्भ किंवा त्याचे इतर अवयव, मांसाचे तुकडे आढळले. त्यामुळेच त्रास झाल्याचे निदान हदगावच्या डॉक्टरांनी केले.
 
 
तृप्ती कदम यांच्यावर हदगाव येथील खाजगी रुग्णालयात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली. यासाठी त्यांना 1 लाख 50 हजार रुपयापेक्षा अधिक खर्च आला होता.
वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट.