बालकांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे काळाची गरज : पालकमंत्री डॉ. भोयर

*अंगणवाडी केंद्रांना शैक्षणिक पुस्तक संचांचे वितरण

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
pankaj-bhoyar : बालकांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. वाचन संस्कृतीच्या माध्यमातून बालकांची भाषा, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता व विचारक्षमता विकसित होत आहे. जिल्ह्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
 
 

pankaj 
 
 
 
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांतील बालकांच्या शैक्षणिक, बौद्धिक व सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने साई मंदिर, वर्धा येथे शैक्षणिक पुस्तक संचाचे वितरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला गुरुकुंज मोझरीचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त जनार्दन बोथे, माजी खासदार रामदास तडस, नप उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, गॅलिलिओ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष दोषी, जिपचे अतिरित मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे आदी उपस्थित होते.
 
 
प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी केले. कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, निलेश किटे, वैशाली येरावार, साई मंदिरचे सचिव सुभाष राठी, स्वाती गव्हाणे, प्रदीप तलमले, विलास आगे, निलेश पोहेकर, जयश्री गफाट, सोनाली कलोडे, पृथ्वीराज शिंदे, सरस्वती मडावी तसेच महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.