ओळख लपवून महाकाल मंदिरात ‘सरफराज’

टिळा लावून हिंदू मुलीसोबत आरतीला हजेरी

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
उज्जैन
mahakal temple मध्यप्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध बाबा महाकाल मंदिराच्या परिसरात एका धक्कादायक प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. बाबा महाकालच्या पवित्र ‘भस्म आरती’च्या रांगेत उभा असलेल्या एका तरुणाचे सत्य समोर येताच तिथे एकच गोंधळ उडाला. कपाळावर हिंदू पद्धतीचा टिळा लावून एका हिंदू मुलीसोबत उभा असलेल्या सरफराज ताज शेख नावाच्या मुस्लिम तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं. हा तरुण पुणे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला पकडून चोप दिला आणि त्यानंतर त्याला महाकाल पोलिसांच्या स्वाधीन केले.
mahakal 
 
mahakal temple मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उज्जैनच्या महाकाल मंदिरात दररोज पहाटे होणाèया भस्म आरतीला देशभरातून हजारो भाविक गर्दी करतात. या आरतीच्या रांगेत पुण्याचा रहिवासी असलेला सरफराज ताज शेख हा कपाळावर मोठा टिळा लावून एका हिंदू मुलीसोबत उभा होता. त्याची ओळख लपवून तो मंदिरात आल्याचा संशय काही लोकांना आला.
बजरंग दलाला लागली कुणकुण
mahakal temple महाकाल मंदिराच्या अतिशय संवेदनशील आणि पवित्र मानल्या जाणाèया भस्म आरतीच्या लाईनीत एक मुस्लिम तरुण ओळख लपवून हिंदू मुलीसोबत उभा असल्याची कुणकुण हिंदू संघटना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना लागली. कार्यकर्त्यांनी तातडीने मंदिराच्या रांगेत शोधमोहीम घेतली आणि सरफराजला पकडले.
mahakal temple बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सरफराजला रांगेतून बाहेर काढत त्याची कसून चौकशी केली असता त्याचे खरे नाव समोर आले. कपाळावर टिळा लावून आणि ओळख लपवून मंदिरात घुसल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्याला घटनास्थळीच चोप दिला. या राड्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याला महाकाल पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. हा तरुण पुण्यातून उज्जैनला आला होता. या घटनेमुळे महाकाल मंदिर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.