आरमोरी,
smart meter protest तालुक्यातील संपूर्ण गावे व आरमोरी शहरातील प्रत्येक घराघरात जोर जबरदस्तीने विद्युत वितरण कंपनीने स्मार्ट मिटर लावण्याची मोहीम राबविली. या मिटरचा मोठ्या प्रमाणात आणि पूर्वीपेक्षा तीन ते चारपट बिल देण्यात आला. त्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे बिल कमी करा किंवा जूनेच मिटर लावा अन्यथा भाकपाच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाकपाच्या वतीने महाराष्ट्र राज्य कौन्सिल मंडळ सदस्य तथा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कार्याध्यक्ष कॉ. डॉ. महेश कोपूलवार यांच्या नेतृत्वात विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी कॉ. प्रकाश खोब्रागडे, सुरेश सोनटक्के, संजय वाकडे, चुन्नीलाल मोटघरे, ऋषी रामटेके, प्रशांत खोब्रागडे, दिपक गोधोंळे, चेतन ठवरे आदी उपस्थित होते.
भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने स्मार्ट/प्रिंटेड मिटर लावण्यापूर्वीच हे मिटर जनतेला परवडणारे नसून सामान्य जनतेची लुबाडणूक आहे. त्यामुंळे हे लावू नये म्हणून विद्युत वितरण कंपनी समोर धरणे आंदोलन करुन निषेध केला होता. तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या मते स्मार्ट मिटर बसविल्यानंतर वीज बिल वाढल्याचे दिसून येते. प्रिपेड बिल पद्धतीत आधी रक्कम भरल्याशिवाय वीज वापरता येत नाही. आर्थिक अडचणीत असलेल्या कुटूंबावर अतिरिक्त भार पडतो. रिचार्ज संपल्यास वीज पुरवठा खंडित होणे, शिल्लक रक्कम संपल्यास वीज तात्काळ बंद होणे, नेटवर्क किंवा सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने चुकीचे रीडिंग किंवा बिल येवू शकते. smart meter protest अशात ग्राहकांच्या गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होऊन वीज वापराची माहिती सतत संकलित होत असल्याने काही नागरिक गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त करु लागले आहेत. ऑनलाईन व्यवहाराची अडचन म्हणजे ग्रामीण भागातील किंवा ज्येष्ठ नागरिकांना रिचार्ज व डिजिटल व्यवहार करणे कठीण जाऊ शकतो. यात अनेक अडचणी असून चुकीचे बिल आल्यास ते दुरुस्त होण्यासाठी वेळ लागतो. तर काही ठिकाणी सेवा शुल्क, रिचार्ज शुल्क, किंवा इतर आकारणी बाबत ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात आक्षेप आहे. याबाबत अनेक ठिकाणी ग्राहकांनी वाढीव बिल व तांत्रिक अडचणी बाबत तक्रारी आहेत. त्यामुळे बिल कमी करून देण्यात यावे किंवा आमचे जुनेच मिटर पूर्ववत लावून देण्यात यावे, अन्यथा विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन छेडले जाईल,असा इशारा देण्यात आला आहे.