नागपूर,
dance acting workshop नृत्य आणि अभिनय या कला बालकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त असून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेते प्रभाकर आंबोने यांनी केले.
देवरंजन बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांच्या वतीने नंदनवन येथे आयोजित नृत्य व अभिनय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी वत्सला पोलकमवार-आंबोने तसेच बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष डॉ. रवींद्र भुसारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनीही यावेळी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजनाने करण्यात आली. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर व नृत्य दिग्दर्शक चिन्मय देशकर हे शिबिरार्थींना नृत्य व अभिनयाचे प्रशिक्षण देणार आहेत.
प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका समाप्ती देशकर यांनी देवरंजन बहुउद्देशीय संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रवीण देशकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पूर्व नागपुरातील ५ ते १५ वर्षे वयोगटातील बालक-बालिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला असून शिबिराबाबत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सौजन्य: रवींद्र भुसारी, संपर्क मित्र