अमरावती,
stolen-two-wheelers-seized : सिटी कोतवाली पोलिसांनी दुचाक्या चोरणार्या तीन जणांच्या टोळीला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आजपर्यंत ८ लाख किमतीच्या २१ मोटर सायकली जप्त केल्या आहे. १७ गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिली आहे. राहूल संतोष सोळंके (वय २४ वर्ष,रा. मरीमाता मंदीर जवळ, कारंजा लाड जि. वाशीम), लखन उत्तमराव चव्हाण (वय २६ वर्ष), महादेव उत्तमराव चव्हाण (वय २८ वर्ष) दोघेही रा. अळनगाव ता. भातकुली असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मोटर सायकल चोरीच्या घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानूसार कोतवाली पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी दाखल गुन्ह्यांचा तांत्रीक बाबीच्या आधारे तसेच गुप्तबातमीदाराकडून प्राप्त झालेल्या माहीतीवरून सखोल तपास केला. तपासदरम्यान आरोपीतांनी पोलिस आयुक्तालय हद्दीत व इतरत्र ठिकाणी वारंवार दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. तपासदरम्यान उपरोक्त आरोपीतांकडून आजपावेतो एकूण ८ लाखाच्या एकूण २१ मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण १७ गुन्हे पोलिसांनी उघड केले आहे. आणखी काही दुचाकी जप्त होण्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक रोशन शिरसाट, गुन्हे पथकाचे प्रमुख पो.उप.नि.तुषार गावंडे, पो.उप.नि रंगराव जाधव व अंमलदार मंगेश भेलाये, हरिश बुंदले, प्रदीप राठोड, प्रमोद हरणे, मंगेश दिघेकर, अथर अली, निलेश कांडलकर, आकाश इंगोले, बाबुसिंग राठोड तसेच दिनेश मिश्रा, सुनील विधाते, जीवन बांडे, अतुल शिरभाते, सतीश कावळे, रामविजय गेडाम, अश्विन बानुबाकोडे, दिनेश जवंजाळ, विश्वास गोंडाणे, राजेश सदांशिवे, आनंद जाधव यांनी केली.