धामणगाव रेल्वेत वादळी पाऊस

झाडांची पडझड, वीज खंडीत

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
धामणगाव रेल्वे,
stormy-rain : बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुसाट वारा आणि धोधो पाऊस बरसल्याने एकीकडे थंठावा झाला असला तरी परिसरात अनेक ठिकाणी झाड आणि विजेची खांब पडल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. स्व. दादाराव अडसड मैदानातले झाड व भागचंद नगर येथील श्री माताजी मंदिर परिसरात अनेक वर्षापूर्वीचे झाड वीजेच्या खांबावर कोसळल्याने धवणेवाडी रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. या परिसरात जोरदार वार्‍यामुळे मोठे झाड जिवंत वीजेच्या खांबावर कोसळल्याची घटना घडली. खांब पडून वाहतूक बंद झाली. वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले.
 
 

amt