'वैभव'शाली सुरुवातीचा शेवट निराशाजनकच!

अर्धशतक पुन्हा हुकले

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Suryavanshi missed half-century भारत ‘अ’ संघाचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीयाची त्रिकोणी मालिकेतील संघर्षमय कामगिरी कायम राहिली आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या स्पर्धेत आणखी एका सामन्यात त्याने चांगली सुरुवात केली, मात्र त्या खेळीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात त्याला पुन्हा अपयश आले.श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तान या संघांदरम्यान सुरू असलेल्या स्पर्धेतील सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. डावाच्या सुरुवातीला वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्यायांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. प्रियांशने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली, तर वैभवने काही काळ संयम दाखवला. मात्र, त्यानंतर त्यानेही फटकेबाजीचा मार्ग स्वीकारला आणि काही आकर्षक चौकार-षटकार लगावले.
 
 
 
Suryavanshi
खेळीदरम्यान त्याला दोनदा जीवदान मिळाले, परंतु त्याचा फायदा घेण्यात तो अपयशी ठरला. काही दमदार फटक्यांनंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने त्याची खेळी संपुष्टात आणली. बाद झाल्यानंतर मैदानावरील काही क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले.वैभवने ३८ धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात दिली, पण पुन्हा एकदा मोठी खेळी करण्याची संधी गमावली. दुसऱ्या बाजूला प्रियांश आर्यने मात्र आपली लय कायम राखत अर्धशतक पूर्ण केले आणि संघाची धावगती टिकवून ठेवली.
 
 
या मालिकेत वैभव सातत्याने जलद धावा करत असला तरी त्याला मोठी खेळी उभारण्यात यश आलेले नाही. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये त्याने चांगली सुरुवात केली, मात्र एकदाही अर्धशतकाचा टप्पा गाठता आलेला नाही. त्यामुळे त्याच्या फलंदाजीतील सातत्य आणि मोठी खेळी करण्याच्या क्षमतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. युवा वयातच आपल्या आक्रमक शैलीमुळे चर्चेत आलेल्या वैभवकडून चाहत्यांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ वेगवान धावा नव्हे तर दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकून राहणेही तितकेच महत्त्वाचे असते. आगामी सामन्यांमध्ये तो या अनुभवातून धडा घेत मोठी खेळी साकारणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.