लोकसभेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष फुटणार

महाराष्ट्र, पश्चिम बंगालनंतर आता कोण?

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
लखनौ
samajwadi party 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक धक्कादायक निकाल समाजवादी पार्टीचा होता. त्यांनी उत्तरप्रदेशात 80 पैकी 37 जागा जिंकून भाजपाला मोठा हादरा दिला होता. पण, आता चित्र बदलणार असून समाजवादी पार्टी फुटीच्या मार्गावर असल्याचा दावा केला जात आहे.
 

samajwadi party 
samajwadi party महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालनंतर आता उत्तरप्रदेशातही मोठा राजकीय भूकंप येणार, अशी चिन्हे दिसत आहेत. योगी सरकारच्या कॅबिनेटमधील मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी केलेल्या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. येत्या काळात समाजवादी पक्षालाही मोठा झटका बसणार आहे. महाराष्ट्र, बंगाल सोडा आता पूर्ण समाजवादी पार्टी भाजपात सहभागी होण्यासाठीची तयारी झाली आहे, असे राजभर यांनी म्हटले आहे.
samajwadi party उत्तरप्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राजभर यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व आले आहे. राजभर यांच्या वक्तव्याला समाजवादी पक्षाचे प्रवक्ते सुनील साजन यांनी खोडून काढले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. सपा येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला राज्यातून हद्दपार करणार आहे. या विधानसभेत राजभर यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही, असा टोलाही सुनील साजन यांनी लगावला.