तुपकराचे आदोलन चिघळले

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
बुलढाणा, 
tupkars-agitation : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस असून हे आंदोलन आता हिंसक वळणावर पोहोचले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक आणि प्रशासनामध्ये प्रचंड तणाव पाहायला मिळाला. एका संतप्त शेतकरी पुत्राने स्वतःला पेटवून घेण्याचा आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दि. १७ जून रोजी दुपारी घडली पोलिसांनी वेळीच धाव घेत त्याला ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
 
 

kl 
 
 
 
रविकांत तुपकर यांच्या पत्नी अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वात शेकडो आक्रमक शेतकर्‍यांनी हातात आपले सातबारा पत्रक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी धडक दिली. कोरा करा कोरा करा, सातबारा कोरा करा अशा घोषणांनी आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होत. आंदोलन सुरू असतानाच अचानक एका शेतकरी पुत्राने प्रशासनाचा निषेध करत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रकार घडताच घटनास्थळावर एकच खळबळ उडाली आणि पोलिसांची प्रचंड धावपळ झाली. तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी तातडीने हस्तक्षेप करत त्या शेतकरी पुत्राला डिझेलसह ताब्यात घेतले. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलन पेटल्याचे चित्र जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे.