समुद्रपूर
fertilizer-theft दहेगाव शिवारातील शेतातून चोरीस गेलेल्या रासायनिक खत प्रकरणाचा समुद्रपूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले खत तसेच गुन्ह्यात वापरलेला ट्रॅटर व ट्रॉली असा ६ लाख ९६ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
fertilizer-theft मिळालेल्या माहितीनुसार, गजानन ढोकपांडे (४४) रा. शेडगाव यांच्या शेतातील ६० बॅग रासायनिक खत तसेच शेजारील दोन शेतकर्यांच्या शेतातील १८ बॅग खत अशा ७८ बॅग खतांची चोरी झाली होती. चोरीस गेलेल्या खताची किंमत ९६ हजार ४६० रुपये होती. या घटनेची तक्रार समुद्रपूर पोलिसात करण्यात आली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे स्वप्निल महाजन (२७) रा. समुद्रपूर, अनिल मांडवकर (३६) रा. दहेगाव व पुंडलिक उरकांदे (४०) रा. दहेगाव यांना ताब्यात घेतले.
fertilizer-theft चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून ७८ पोते रासायनिक खत, गुन्ह्यात वापरलेला ट्रॅटर व ट्रॉली असा ६ लाख ९६ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांनाही अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दीपक वानखेडे, वीरेंद्र मस्के, प्रकाश मैद, कपिल मेश्राम, संजय वानखेडे व रामू पंधरे यांनी केली.