कराटे आत्मसंरक्षण, व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम

माजी खासदार तथा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
देवळी,
National Karate Championship आजच्या स्पर्धात्मक युगात कराटे हे केवळ स्वसंरक्षणाचे साधन नसून व्यतिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम ठरत आहे. कराटे प्रशिक्षणामुळे मुला-मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो तसेच शिस्त, संयम आणि एकाग्रता वाढीस लागते. नियमित सरावामुळे शारीरिक तंदुरुस्ती सुधारते आणि संकटाच्या प्रसंगी शांत राहून योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, असे मार्गदर्शन माजी खासदार तथा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी केले.
 

gg 
देवळी येथील विदर्भ केसरी मा. खासदार रामदासजी तडस इंडोअर स्टेडियम देवळी येथे स्पोर्ट शोतोकान कराटे - डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा संलग्नित स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२६ च्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल होते. कार्यक्रमाला नगर परिषद सभापती शुभांगी कुर्जेकर, नगरसेवक उमेश कामडी, रवी कारोटकर, शोतोकान कराटे-डो इंडियाचे महासचिव तथा स्पर्धा कंट्रोलर शिहान अनवर अली, संघटनेच्या महाराष्ट्र ब्रांच अ‍ॅडव्हायझर सेन्साई चेतन जाधव, संचालक सेन्साई राजू कांबळे, मुख्य आयोजक तथा संस्था अध्यक्ष शिहान मंगेश भोंगाडे, वुशू असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश राऊत आदी उपस्थित होते.
देशाच्या विविध राज्यांतून सब ज्युनिअर, केडिट ५०० खेळाडूंची, ज्युनिअर, सीनियर व मेगा इव्हेंट ६०० असे अकराशे खेळाडू सहभागी झाले होते. खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके तसेच सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.
प्रास्ताविक मंगेश भोंगाडे यांनी केले तर संचालन अभिषेक सोनवणे व पूजा गोसाटकर, तर आभार मनीषा राऊत व कार्तिक भगत, प्रणय विटणकर यांनी व्यक्त केले.