मुंबई
uddhav thackeray's shiv sena उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सहा खासदार अखेर पक्षाची साथ सोडून गेले, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, त्यांनी साथ सोडण्यामागे हिंदुत्व, विकास असे कोणतेही कारण दिलेले नाही. या खासदारांनी दिलेले कारण अगदीच वेगळे आहे.
uddhav thackeray's shiv sena या सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडण्यापूर्वी एक ठराव केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पक्षाची दिशा भरकटली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना कधीही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते. तृणमूलच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव चर्चेत आला असून त्यापाठोपाठ संजय राऊत शिवसेना उद्धव ठाकरे गटालाही काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करू शकतात. हे आपल्याला मान्य नसल्याने पक्ष सोडत असल्याचे या खासदारांनी म्हटले आहे.
uddhav thackeray's shiv sena महत्त्वाची बाब म्हणजे, बंडखोर खासदारांनी स्वतःला स्वतंत्र गट म्हणून घोषित केलेले नाही; त्यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार, त्यांनी थेट शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, प्रसारमाध्यमांच्या वृत्तांमध्ये त्यांना ‘स्वतंत्र गट’ असे संबोधले जात असले तरी, फुटलेल्या खासदारांनी त्यांच्या ठरावात असा दावा करण्यात आला आहे की, ते शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन झाले आहेत.
uddhav thackeray's shiv sena खासदारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ
ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटू शकतात, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये या अनुषंगाने स्थानिक पोलिसांकडून खासदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनीही काल झालेल्या पत्रकार परिषदेत अनुपस्थित खासदारांना इशारा दिला होता. त्यानुसार खबरदारी म्हणून पोलिसांकडून संबंधित खासदार यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवल्याचे कळते. मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांच्या घराबाहेरही मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान नॉटरिचेबल असलेल्या खासदारांचा वेगळा गट होत असताना. या गटाचं नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
uddhav thackeray's shiv sena उद्धव ठाकरेंची साथ सोडणारे खासदार
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील