कुरखेडा,
burglary case तालुक्यातील आंधळी येथे घरी कुणीच नसल्याने कुलूपबंद असलेल्या घरात कुलूप तोडत सोन्याचे दागिने व रोकड लंपास करणार्या दोन आरोपीना 24 तासात कुरखेडा पोलिसांनी बेड्या ठोकत जेरबंद केले व त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. आंधळी येथील डॉ. अनिल वाघमारे हे 12 जून रोजी घराला कुलूप लावून आपल्या मुळगावी गेले होते. ते 15 जून रोजी परत आले असता घराच्या समोरील दारावरील कुलूप अज्ञात आरोपीने तोडत बाजूला फेकल्याचे आढळून आले.
यावेळी घरातील साहित्याची पाहणी केली असता आरोपीने कपाटातील 10 ग्राम सोन्याचे दागिने व काही रोकड पळविल्याचे निदर्शनात आले. दरम्यान, याबाबत त्यांनी कुरखेडा पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. तसेच श्वानपथक व फ्रीगंरप्रिंट तज्ञांचा मदतीने आरोपीचा शोध सुरू केला.burglary case पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे 24 तासाच्या आत घरफोडी करणारे गावातीलच वैभव समीर जांभूळकर (29) व गणेश देविदास भैसारे (32) दोन्ही रा. आंधळी यांना अटक करण्यात आली.
सदर कारवाई ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात साहायक पोलिस निरीक्षक प्रियंका आघाव, पोलिस हवालदार शेखलाल मडावी, पोलिस शिपाई नरसिंग कोरे, सलिश गुडा यांच्या चमूने केली.