मैराळडोह येथील घटना
मालेगाव,
cattle barn on fire तालुयातील मैराळडोह येथील गुरांच्या गोठ्याला व गोठ्याशेजारील घरांना आग लागून गोठ्यातील शेतीपयोगी साहित्यासह घरातील संसारपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाल्याने डिंगांबर नामदेव जेजेकार यांच्यासह इतर चार जणांचे जवळपास आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मैराळडोह येथे १६ जून रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहिती नूसार मैराळडोह येथील शेतकरी डिगांबर नामदेव जेजेकार यांच्या घराजवळील गोठ्याला राञी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये गोठ्यातील पेट्रोल पंप, लाकडी बैलगाडी, पट्टी केबल, लाकडी वखर, शेती उपयोगी साहित्यासह डवरे, पाण्याची टाकी, खिडकी, दरवाजा, कुलर, शेण खत, गोठ्यावरील टिन पत्रेजळून खाक झाले.
यामुळे जेजेकार या शेतकर्याचे १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. तसेच ही आग वाढत जाउन जेजेकार यांच्या गोठ्या शेजारील पंजाब घुगे यांच्याही गोठ्याला लागली, यामुळे पंजाब घुगे यांची म्हैस, मोटरपंप, प्लास्टिक पाईप सट, पेट्रोल पंप, पाण्याची टाकी, शेतीपयोगी लाकडी अवजारे, गुरांचा चारा आदी साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे अंदाजे २ लाख १ हजार रुपयांचे नूकसान झाले. तसेच ही आग दादाराव नागोराव घुगे यांच्याही गोठ्याला लागली त्यामुळे या आगीत दादाराव घुगे यांचे वीज केबल, घरगुती वापराची मोटर, पाईप जळून खाक झाले व दोन भिंतीही निर्जीव झाल्याने त्यांचे अंदाजे २ लाख ९ हजारांचे नुसकान झाले आहे. या आगीने काशिनाथ एकनाथ माने यांच्या राहत्या घरालाही आपल्या कवेत घेतले. त्यामुळे काशिनाथ माने यांच्या दोन दुचाकी, वीज मिटर, केबल, जळून खाक झाले. त्यामुळे त्यांचे अंदाजे १ लाख ५३ हजार ६५० रुपयांचे नुकसान झाले तर गजानन एकनाथ माने यांच्या घराला लागलेल्या आगीत गजानन माने यांच्या घराचा दवाजा,पलंग, बाज, पाईप, केब, गहू पोते,टीनपञे जळून खाक झाली तर सिमेंट कॉग्रेटची भिंत आगीमुळे निर्जीव झाल्याने त्यांचे अंदाजे ५२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागल्याचे लक्षात येतात गांवकर्यांनी घटनास्थळी पोहचून आग आग नियत्रणात आणली. या आगीमध्ये शेतकर्यांचे सिंचनाचे सर्व साहित्य व शेती उपयोगी सर्व साहित्य तसेच जनावरांचा चारा जळून खाक झाल्यामुळे शेतकर्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. महसूल विभागाने पंचनामा केला असून नुकसान ग्रस्त शेतकरी कुटूंबाला आगीच्या नुकसान भरपाई देण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.