अमरावती काँग्रेसमध्ये उभी फूट

व्हीप झुगारून नगरसेवकांचे मतदान भाजप उमेदवाराचा विजय निश्चित

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
अमरावती
legislative council election amravati अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच आज काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि गटबाजी चव्हाट्यावर आली. निवडणुकीत तटस्थ राहण्याच्या आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या पक्ष नेतृत्वाच्या आदेशाला (व्हीप) केराची टोपली दाखवत काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यामुळे अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
congress
 
legislative council election amravatiअमरावती विधान परिषदेच्या जागेसाठी गुरुवारी उत्साहात मतदान घेतले असून मतमोजणी 22 जून रोजी होणार आहे. मतदानाच्या दिवशीच काँग्रेसच्या गोटात झालेल्या या बंडखोरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या मैदानातून माघात घेतल्यामुळे पक्षाची मोठी कोंडी झाली. या पृष्ठभूमीवर वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा नाकारत शहर काँग्रेसने ऐनवेळी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला.
 
legislative council election amravati महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते विलास इंगोले तसेच शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या स्वाक्षरीने एक अधिकृत व्हीप (पक्षादेश) जारी करण्यात आला होता. यामध्ये सर्व नगरसेवकांना मतदानाला गैरहजर राहून तटस्थ राहण्याचे आदेश दिेले होते. हा आदेश अनेक नगरसेवकांनी मोडीत काढल्याने पक्षात नेमके सुरू काय आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.