बंदी झुगारून खडकीत एचटीबीटी कपाशीची लागवड

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
राळेगाव, 
htbt cotton केंद्र शासनाने यंदाही एचटीबीटी कापूस बियाण्याच्या लागवडीला परवानगी न दिल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकèयांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बियाण्यांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत संघटनेने बुधवार, 17 जून रोजी राळेगाव तालुक्यातील खडकी येथे प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्याची प्रतिकात्मक लागवड करण्यात आली.
 
 
htbt
 
शेतकèयाना 2008 पासून तणनाशक-प्रतिरोधक तंत्रज्ञान असलेले एचटीबीटी कापूस बियाणे शेतकèयांना उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. मात्र, आजपर्यंत या तंत्रज्ञानाला अधिकृत मान्यता मिळालेली नसल्याने शेतकरी आधुनिक कृषी तंत्रज्ञानापासून वंचित राहत असल्याचा दावा तंत्रज्ञान मेळाव्यात करण्यात आला केला. या निषेधाचा पहिला टप्पा म्हणून शेतकरी संघटनेने 10 जून रोजी गुजरात सीमेवरील नंदुरबार येथे सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान गुजरातमधून प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे महाराष्ट्रात आणले गेले होते. शेतकरी संघटनेकडून याच आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून बुधवार, 17 जून रोजी दुपारी 12 वाजता राळेगाव तालुक्यातील खडकी येथील राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात शासनाची बंदी झुगारून ‘प्रतिबंधित बियाण्याची लागवड’ करण्यात आली.
 
 
यावेळी झालेल्या तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळाव्यात एचटीबीटी काय आहे. शेतकरी संघटनेच्या मते, शेतकèयांना कोणते बियाणे वापरायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. शासनाने नवीन कृषी तंत्रज्ञानावर निर्बंध घालण्याऐवजी शेतकèयांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी संघटनेने मागणी केली. यावेळी रिधोरा येथील शेतकरी अतुल गोहकार व वाई येथील ओंकार काळे यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. तर एचटीबीटी बियाणे तंत्रज्ञान शेतकèयांपर्यंत पोचविणे ही देशभक्ती आहे. शेतकèयांच्या बांधापर्यंत बियाणे पोचवीत असताना कृषी विभागाच्या कार्यवाहीला बळी पडलेले प्रेमानंद डाखरे यांचा सत्कार करण्यात आला.
 
 
या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप, अध्यक्ष ललित बहाळे, महिला आघाडी अध्यक्ष प्रज्ञा बापट, स्वतंत्र भारत पक्ष अध्यक्ष अनिल घनवट, सीमा नरोडे, विजय निवल, मिलिंद दामले, दीपक आनंदवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गजानन पारखी, सतीश देशमुख, चंद्रशेखर देशमुख, दशरथ पाटील, आशिष मुसळे, हिंमत देशमुख, बबन चौधरी, अक्षय महाजन, गिरीश तुरके, मोहन चौधरी, गोपाळ भोयर, किशोर झोटींग, निलेश डवरे, दशरथ काळे, गोपाळ नांदुरकर, मारुती बावणे, भास्कर पाटील, गजानन कोल्हे, विठ्ठल खोंडे, देविदास काळे, रूपेश बागमार, राजेंद्र येपारी, मधुकर बैलमारे, प्रेमानंद डाखरे यांच्यासह राज्यातील अनेक पदाधिकारी, महिला व युवा आघाडी कार्यकर्ते, शेतकरी व कृषी अधिकारी उपस्थित होते. या आंदोलनावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. याबाबत कृषी अधिकाèयांना विचारणा केली असता पाहिजे त्या प्रमाणात नमुन्याकरिता बियाणे मिळू शकले नाही, असे सांगितले. यावेळी ठाणेदार बोरखडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बदोबस्त होता.