शिरपूर प्रतिनिधी
cylinder-explosion- शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील वाघी मुसलमानांची येथे दि. १८ जुनं रोजी १२ वाजताच्या वाजताच्या सुमारास अचानक शेख शाहरुख शेख मेहबूब यांच्या घरामध्ये सिलेंडरचा भडका होवुन स्फोट झाला यामध्ये त्याचे घर जळून खाक झाले यामध्ये सहा जण गंभीर जखमी तर एक म्हैस भाजली तीन ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाले या पाचही जणांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे .
cylinder-explosion- मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील वाघी मुसलमानाची येथे दि. १८ जुनं रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घरामध्ये हजरा बी शे. शाहरुख ही महिला गॅसवर चहा करत असताना घरामध्ये अचानक शॉर्टकट झाले त्यामुळे गॅस सुरू असल्यामुळे अचानक घरामध्ये सिलेंडरचा भडका उठला त्यानंतर सिलेंडरचा फोटो झाला या मध्ये शेख शाहरुख शेख मेहबूब, शेख अ. रहमान शेख मो. ,शेख जुबेर शेख रफिक, ,महिला हजरबी शेख शाहरुख, एक सहा वर्षेची लहान मुलगी व सिद्धार्थ भीमराव भालेराव हे सहा जण या आगीमध्ये गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले आहे. यामध्ये घराच्या बाजूलाच असलेली एक म्हैस सुद्धा गंभीर रित्या भाजली आहे
cylinder-explosion- आगीचे कारण समजताच गावातील सरपंचाचा मुलगा योगेश सरोदे, उपसरपंच शेख वाजीद शेख अन्सार पोलीस पाटील शेख शब्बीर शेख मुनार व गावातील इतर मंडळी हे लगेच घटनास्थळी दाखल होऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला व मालेगाव व रिसोड येथून नगरपरिषीची अग्निशामक ची गाड्या पाचारण करण्यात आल्या त्यामुळे मोठी दुर्घटना टळली तसेच शिरपूर पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली आग विझवत असताना सिद्धार्थ भीमराव भालेराव हा तरुण आग विझवताना खाली पडला व गंभीर रित्या जखमी झाला याला सुद्धा उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले आहे.