दर्जा राखून पांदण रस्ते वेळेत पूर्ण करा : आ. कुणावार

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
हिंगणघाट
pandan rasta yojana हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी (रेल्वे) परिसरातील मातोश्री ग्रामसमृद्धी पांदण रस्ते योजना अंतर्गत मागीलवर्षी हाती घेण्यात आलेल्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा आ. समीर कुणावार यांनी घेतला. यावेळी आ. कुणावार यांनी कामांचा दर्जा राखून वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
 
kunawar
 
pandan rasta yojanaबैठकीत विविध गावांतील पांदण रस्त्यांच्या कामांची प्रगती, प्रलंबित बाबी आणि अंमलबजावणीदरम्यान येणार्‍या अडचणींचा आढावा घेण्यात आला. शेतकर्‍यांना वर्षभर शेतापर्यंत सुलभ व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्या, शेतीमालाची ने-आण सुलभ व्हावी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी मिळावी, यासाठी सर्व कामे उच्च दर्जाची ठेवून निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावी तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचनाही आ. कुणावार यांनी दिल्या.
 
 
pandan rasta yojana महाराष्ट्र शासनाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी पांदण रस्ते योजना २०२५ अंतर्गत शेतांपर्यंत मजबूत व कायमस्वरूपी रस्ते निर्माण करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक माती, दगड व मुरूम शासनामार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिले जात आहेत. मनरेगा व राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही योजना शेतकर्‍यांच्या शेतमाल वाहतुकीतील अडचणी कमी करून त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास आणि आर्थिक सक्षमीकरणास हातभार लावणारी ठरणार आहे. प्रलंबित कामांना गती देऊन सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी तालुयाचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते, उपअभियंते, नगर रचना अधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.