hoarding of fertilizers मृग नक्षत्र सुरू होताच राळेगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात शेतकरी राजा खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज झाला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनच्या आगमनासोबतच शेतकèयांच्या चिंतेत भर पडली आहे. राळेगाव तालुका कापूस आणि सोयाबीनचा पट्टा म्हणून ओळखला जातो. याच संधीचा फायदा घेत बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा सुळसुळाट होण्याची शक्यता निर्माण झाली असून काही व्यापाèयांकडून रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई आणि साठेबाजी सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागात आदिवासी आणि मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब शेतकरी राहतात. कापूस आणि सोयाबीनच्या पिकावरच त्यांच्या कुटुंबाची वर्षभराची गुजराण अवलंबून असते. पेरणीची वेळ निघून जाऊ नये म्हणून शेतकरी कृषी केंद्रांवर गर्दी करत आहेत. परंतु, अमुक खत संपले आहे, ते हवे असल्यास दुसèया न आवडणाèया ब्रँडचे बियाणे घ्यावे लागेल किंवा खतांचे दर वाढले आहेत असे सांगून शेतकèयांची दिशाभूल करण्यात येत आहे. तालुक्यात छुप्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांची विक्री सुरू असताना मात्र कृषी विभागाच्या हाती अजूनपर्यंत एकही पाकीट लागलेले नाही. तालुक्यामध्ये यावर्षी एकही कारवाई न होणे म्हणजे अर्थपूर्ण दुर्लक्ष. केलेले दुर्लक्ष हे न समजणारे कोडे असून वरिष्ठ अधिकाèयांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
कृषी केंद्र तत्काळ तपासण्याची गरज
यवतमाळात मोठ्या प्रमाणात मातीमिश्रित रासायनिक खत सापडले हे खत कृषी विभागाने कारवाई करून जप्त केले. मात्र ते खत राळेगाव तालुक्यातही आले की काय, अशी शंका शेतकèयांना असल्यामुळे कृषी विभागाने तत्काळ तपासणी करावी अशी मागणी होत आहे. तालुक्यातील काही कृषी केंद्रांकडे विशिष्ट खतांचा साठा आहे. मात्र त्यांनी टंचाईचे कारण सांगून बेभाव दराने विक्री चालविली आहे. बाहेर कुणाला सांगितले तर खत देणार नाही असे दम भरले जातात.
त्यामुळे यावर नियंत्रण कोणाचे हा प्रश्न आहे. आजवर कधीही झाला नसेल एवढा त्रास यावर्षी शेतकèयांना होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कृषी विभागाने आपली पथके राळेगाव तालुक्यात धाडण्याची गरज आहे. राळेगावसह झाडगाव, सावरखेडा, वाढोणाबाजार, अंतरगाव, येवती, दहेगाव यासह याही गावांमध्ये खतविक्रीत गोंधळ आहे. कृषी केंद्रांसह गोदामांची तपासणी पथकाने करावी, अशी मागणी होत आहे.
राळेगावातील शेतकरी व्यापाऱ्यांच्या दावणीला
आश्चर्याची बाब म्हणजे या काळ्याबाजारावर नियंत्रण ठेवण्यास जबाबदार असलेला कृषी विभाग मात्र अत्यंत संथ गतीने काम करत आहे. अद्याप तालुक्यात कृषी केंद्रांची कडक तपासणी किंवा भरारी पथकांचे छापे पडलेले तालुक्यात तरी दिसले नाहीत.
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी पूर्णपणे व्यापाèयांच्या दावणीला बांधला गेला आहे. वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. कृषी विभागाने साठेबाजांवर कडक पावले उचलावीत अशी मागणी आता तालुक्यातून जोर धरत आहे.