किरण चौधरी यांना दुसर्‍यांदा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
कारंजा लाड
ideal teacher' award शिक्षण क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून केलेल्या अविरत, प्रामाणिक आणि प्रभावी कार्याची दखल घेत कारंजा येथील गोविंद पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक तथा अध्यक्ष किरण चौधरी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पुणे येथील ग्लोबल एलिट मीडिया अँड टेक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. किरण चौधरी यांना अल्पावधीत मिळालेला हा दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार असून, त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  
wardha news1
 
ideal teacher' award  शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांच्या हक्कांसाठी त्यांनी प्रभावी लढा उभारला आहे. गेल्या अडीच दशकांपासून त्यांनी खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळांशी संबंधित विविध प्रश्न शासन स्तरावर मांडले आहेत. विशेषतः आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाचा परतावा, जुनी पेन्शन योजना , टप्पावाढ अनुदान, शिक्षक व संस्थाचालकांचे हक्क यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यापूर्वी त्यांना मेस्टा संघटनेचाही सन्मान प्राप्त झाला असून, आता पुण्यातील प्रतिष्ठित संस्थेकडून मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या कार्याची व्यापक पोहोच अधोरेखित करणारा ठरला आहे.
ideal teacher' award पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना हा सन्मान माझा एकट्याचा नसून गेल्या २५ वर्षांत मला साथ देणार्‍या प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक, मित्र परिवार, आणि माझे कुटुंबातील व्यक्तीचा असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांचे हक्क आणि त्यांच्या भविष्याची सुरक्षा हीच माझी प्राथमिकता असून, हा पुरस्कार आगामी लढ्यासाठी अधिक बळ देणारा ठरेल. पुण्यात झालेल्या या दिमाखदार सोहळ्यास शिक्षण, तंत्रज्ञान आणि माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. किरण चौधरी यांना मिळालेल्या या सन्मानामुळे अमरावती विभागातील शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.