कळमना मार्केट खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेप

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,
Kalamna Market murder कळमना मार्केट येथील खून प्रकरणातील आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. कान्हा मार्कंडेय असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी पुष्पा रामटेके (रा. कळमना, नागपूर) यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिस ठाण्यात हत्याकांडाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Kalamna Market murder  
गेल्या १३ जुलै २०२३ रोजी कळमना मार्केट येथे आरोपी कान्हा माकंर्डेय, अजित पठाण तसेच फिर्यादी पुष्पा हे फळांच्या गाड्यांमधून माल उतरविण्याचे व ठेवण्याचे काम करीत होते. घटनेच्या दिवशी आरोपी कान्हा मार्कंडेय याने पुष्पा यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यावर अजित पठाण याने आरोपीला अशा प्रकारची शिवीगाळ का करीत आहे, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या जवळील कटरने अजित पठाण याच्या पोटावर सलग सहा वार करून त्याचा खून केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध सबळ व Kalamna Market murder भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रत्ना घाटे यांनी सर्व साक्षीदारांची प्रभावी तपासणी करून तसेच सखोल व प्रभावी युक्तिवाद सादर करून आरोपीचा गुन्हा सिद्ध केला. पुराव्यांचे मूल्यमापन केल्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी आरोपीला दोषी ठरवून सश्रम आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली.