कारंजा (घा.)
forest-department चिंचोली भागातील ६० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या दोन वर्षाच्या अस्वलाला सुरक्षित रेस्यू करून नैसर्गिक अधिवासात मुत करण्यात आले. ही कामगिरी पोलिसांच्या मदतीने वन विभागाच्या बचाव पथकाने केली.
forest-department मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील गणेश तांबूसकर रा. सेलगाव (उ.) यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत अस्वल पडले असल्याची माहिती १७ रोजी दुपारी २ वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांना मिळाली. वन विभागाच्या अधिकार्यांनी आपल्या सहकार्यांसह तातडीने घटनास्थळ गाठले. विहीर कोरडी व जीर्ण असल्यामुळे अस्वलीला सुरक्षित काढण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला. वन विभागाच्या पथकाने विहिरीत पिंजरा उतरवला. त्यानंतर अस्वलास पिंजराबंद करून विहिरीबाहेर काढले. अस्वलाची पशुवैद्यकीय अधिकार्यांकडून आरोग्य तपासणी केल्यावर अस्वलाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
forest-department ही मोहीम उपवनसंरक्षक हरवीर सिंह, सहाय्यक वनसंरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनात एस. बी. केकान, ए. के. गरे, दीपक कंडीकर, सी. एस. उईके, एस. बी. नागोसे, व्ही. एस. अंबोलकर, एस. व्ही. बुट्टे, वाय. पी. अरसड, सूरज कौरती, पुरुषोत्तम कळसाईत, भावेश नासरे, गणेश काळे, आयुष सातपुरे, गौरव कौरती यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी राबविली.