भाजपामध्ये जम्बो पक्षप्रवेश

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
काँग्रेसच्या मारोती गौरकार यांच्यासह अनेकजण भाजपात
राष्ट्रवादी, शिवसेना, छावा संघटनेलाही खिंडार

मारेगाव, 
मारेगाव तालुका काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष maroti gaurkar मारोती गौरकार यांनी मंगळवार, 16 जूनला आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. बदकी भवन येथे झालेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात हा प्रवेश सोहळा पार पडला. दुपारी 2 वाजता सुरू झालेल्या मेळाव्याला भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल चौहान, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, रवी बेलुरकर यांच्यासह माधव कोहळे, अनूप महाकुलकर, शंकर लालसरे, प्रशांत नांदे, दीपिका रस्से, मंगेश देशपांडे, ज्ञानेश्वर चिकटे व अमोल कुमरे उपस्थित होते.
 
 
jambo
 
काँग्रेससोबतच राकाँ, शिवसेना व छावा संघटनेलाही खिंडार पडले आहे. राकाँचे दयाल रोगे, शिवसेनेचे गोविंद निखाडे, अब्दुल अजीज सिद्दीकी, शादाब अहमद, शंकर कोडापे, सदाशिव मेश्राम, विशाल काळे, दिशांत करडे यांनी भाजपाची विचारधारा स्वीकारली. याशिवाय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिलास बुरान, बोटोणीचे माजी सरपंच महादेव सिडाम, गोवारी समाज तालुका उपाध्यक्ष रामदास नेहारे, गुरुदेव सेवा मंडळाचे रमेश गोचे व महागावचे सूरज गाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व युवक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना मान्यवरांनी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. मारोती गौरकार यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेससह इतर पक्षांना मोठे खिंडार पडल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद वाढेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाèयांनी व्यक्त केला. मेळाव्याला भाजपा पदाधिकारी, महिला, युवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.