विद्यापीठाच्या मानाच्या पुरस्कारांसाठी अर्जांची संधी

विद्यार्थ्यांना ६ जुलै पर्यंत सादर करता येणार अर्ज

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur University awards राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट छात्रसेना (एनसीसी) कॅडेट आणि उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू पुरस्कारांसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांना ६ जुलै पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
 

Nagpur University awards  
शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून विद्यापीठाचा नावलौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात. यंदा सुधारित नियमावलीनुसार निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून, प्रत्येक पुरस्कारासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक आहे.प्रत्येक अर्जासोबत संबंधित पुरस्काराची नियमावली जोडण्यात आली असून, अर्ज विभागप्रमुख, प्राचार्य किंवा संचालक यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्या मार्फतच विद्यापीठाकडे पाठविणे बंधनकारक आहे. अपूर्ण अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर झालेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.पुरस्कारांची नियमावली आणि अर्जाचा नमुना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, संबंधित महाविद्यालये व विभागांनी विद्यार्थ्यांपर्यंत याNagpur University awards  पुरस्कारांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी या पुरस्कारांसाठी अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. राजू हिवसे आणि विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ यांनी केले आहे.