- प्रमोद महाराज ठाकरे यांचे आवाहन, नागपूर भक्ती महोत्सवाचा प्रारंभ
नागपूर,
Pramod Maharaj Thackeray भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची कास धरून अंधश्रद्धेपासून मुक्त होण्याचे आवाहन प्रमोद महाराज ठाकरे यांनी केले. महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी आणि नागपूर भक्ती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नागपूर भक्ती महोत्सवाच्या प्रथम सत्रात ते बोलत होते.यावेळी प्रमोद महाराज ठाकरे म्हणाले की, वारकरी भगवंताला आपल्या अंतरंगात येण्याची आर्त हाक देतात. कारण भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात खरा आनंद आणि रंग येत संतांनी समाजाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य केले आहे. संतांच्या विचारांमधूनच मानवाला योग्य जीवनमार्ग मिळतो. संत जनाबाई यांच्या अभंगाचा संदर्भ देत त्यांनी संत आणि परमेश्वर यांचे अभिन्न नाते स्पष्ट केले. जसे सूर्य आणि त्याची किरणे किंवा दीप आणि ज्योत यांच्यात भेद नसतो, तसेच संत आणि ईश्वर यांच्यातही भेद नाही. संत हे परमेश्वराचेच साक्षात स्वरूप असून त्यांच्या सहवासातून भक्ताला ईश्वरप्राप्तीचा मार्ग सापडतो, असे त्यांनी सांगितले.
कोराडी मंदिर परिसरात १८ ते २३ जून २०२६ दरम्यान हा भक्तीमय सोहळा मोठ्या उत्साहात सुरू असून ग्रंथराज शीज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आणि हरिजागर आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आले आहे. महोत्सवाची सुरुवात आई महालक्ष्मी जगदंबा आणि ग्रंथराज शीज्ञानेश्वरी पूजनाने झाली. संजय महल्ले, भास्कर तिडके आणि श्किरण राऊत यांच्या हस्ते पूजन विधी करण्यात आला. त्यानंतर सामूदायिक ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ करण्यात आला. दरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ काकड आरती, सकाळी ६.३० ते ९.३० शीज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ कीर्तन सेवा, सायंकाळी ४ ते ५ हरिपाठ, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन सेवा आणि रात्री ९ नंतर हरिजागर असा नियमित कार्यक्रम होणार आहे.
आजची कीर्तन सेवा:
महोत्सवाच्या द्वितीय दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत सुबोध महाराज महल्ले यांचे कीर्तन होईल. तसेच सायंकाळी ६.३० ते ८.३० या सत्रात गुरुवर्य बंडामहाराज कराडकर यांची कीर्तन सेवा होणार आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भातील भाविकांनी या भक्ती, अध्यात्म आणि माजप्रबोधनाच्या पर्वात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.