माणुसकी नगरात अमानूष हत्या

सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी, दोन आरोपी अद्यापही फरार

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
रिसोड
murder news १५ जून रोजी रात्री १२:३० रिसोड शहरातील माणुसकी नगर येथे घडलेल्या हत्याप्रकरणी सहा आरोपींना रिसोड पोलिसांनी अटक केली असून, दोघेजण अद्यापही फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.सर्व आरोपींना रिसोड येथील न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सदर हत्या ही खोर्‍याच्या फायबर दांडणयाने केली असल्याचे तपासा दरम्यान स्पष्ट झाले असून याबाबतची कबुली आरोपी संजय अंभोरे याने दिली आहे.
  
murder
murder news याबाबत माहिती अशी की १५ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता च्या दरम्यान माणुसकी नगर येथे दोन शेजार्‍यांमध्ये कडायाचे भांडण झाले होते. यामध्ये दोन्ही कडील काहीजण जखमी झाले होते. यामध्ये मृतक भागवत सुभाष गायकवाड याची आई हिला तलवारीने मारहाण करण्यात आले असल्याने अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आली होते तर दुसर्‍या गटातील काही व्यक्ती सुद्धा जखमी असल्याने त्यांचाही उपचार सुरू होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये प्रमोद अंभोरे, दीपक अंभोरे, संजय अंभोरे, मनीषा अंभोरे, सीता अंभोरे, आदित्य मानवतकर यांचा समावेश असून, सर्व आरोपींची न्यायालयात कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
 
murder news सदर हत्या साठी दगड किंवा लोखंडी रॉड वापरला असल्याचा प्राथमिक अंदाज घटनेच्या दिवशी लावण्यात आला होता. मात्र पोलिसांनी केलेला पंचनामा व तपास यामध्ये मृतक भागवत सुभाष गायकवाड यांच्या मृतदेहाजवळ सिमेंटचे काही तुकडे विखुरलेले होते तर हे सिमेंटचे तुकडे बांधकामासाठी वापरात येणार्‍या खोर्‍याच्या दांडुयाचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सदर खोर्‍याचा दंडका जप्त केला असून, पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संतोष आघाव हे करीत आहेत.