एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
आर्णी,
two-wheeler accident बुधवारी रात्री 9 वाजता नागपूर-तुळजापूर महामार्गावरील लोणबेहळ उड्डाणपुलावर दोन दुचाकींची टक्कर झाली. यात निचपूर-किनवट येथील 42 वर्षीय उमेश गणपत लाकडे यांचा मृत्यू झाला. दुसèया दुचाकीवरचे 30 वर्षीय रवी गोविंद तोडसाम आणि 22 वर्षीय प्रेम भारती गंभीर जखमी झाले. तिघांनाही आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. उमेश लाकडे यांना मृत घोषित करण्यात आले, तर रवी तोडसाम यांना यवतमाळ येथे हलवण्यात आले. प्रेम भारती यांची प्रकृती खालावल्याने त्याच रात्री त्यांना नागपूरला हलवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच, आर्णी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक नरेंद्र देशमुख, योगेश संकुलवार आणि मंगेश जगताप, रुद्राक्षवार घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही दुचाकी आर्णी पोलिस ठाण्यात आणण्यात आल्या. मृत उमेशचा भाऊ, लक्ष्मण निखाडे याने पोलिस ठाण्यात रवी तोडसामविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या उड्डाणपुलावर उमेश लाकडेंना दुचाकीला चुकीच्या बाजूने येणाèया रवी तोडसाम याने ठोकून दिले. तो आपल्या दुचाकीने प्रेम भारती याच्यासोबत आर्णीच्या दिशेने येत होता. चुकीच्या दिशेने आणि बेदरकारपणे गाडी चालवताना त्याने समोरून आलेल्या दुचाकीला धडक दिली.
ज्यात निचपूरचे रहिवासी उमेश लाकडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना दोन मुलगे, आई आणि पत्नी आहेत. पुढील तपास आर्णी पोलिस करत आहेत.