सेलूत पाण्यात आढळल्या अळ्या

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
सेलू
worms in Water Supply नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे म्हणून सेलू नगर पंचायतने कोट्यवधी रुपये खर्च करून नळ योजनेचे काम सुरू केले आहे. पण, आठवडी बाजारालगत असलेल्या प्रभाग १६ मध्ये गुरुवारी नळाला आलेल्या दुर्गंधीयुत पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागातील पाण्यामध्ये अळ्याही निघाल्याची ओरड आहे. गुरुवार १८ रोजी प्रभाग १६ मध्ये रहिवासी असणार्‍या काही नागरिकांच्या घरगुती नळातून दुर्गंधीयुत आणि अळ्यायुत पाणी आले. एकाएकी सकाळी ९ च्या सुमारास नळाला आलेल्या दुर्गंधीयुत पाण्यामुळे नागरिक अचंबित झाले. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शयता नाकारता येत नाही.

water in selu
 
worms in Water Supply देवराव कोल्हे, शेख जलील, हारून कुरेशी, अशोक पवार आदींच्या नळाला हे दुर्गंधीयुत पाणी आले आहे. याबाबत नगर पंचायतचे पाणी पुरवठा सभापतींना माहिती दिली असता पाणी पुरवठा कर्मचार्‍यांनी तत्काळ पाहणी केली. यावर कर्मचारी काय उपाययोजना करतात, याकडे लक्ष लागले आहे.
 
worms in Water Supplyयाबाबत नगर पंचायतचे पाणी पुरवठा सभापती दफ्तरी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी पाठवून शहानिशा केली जाईल व दुर्गंधीयुत पाणी कसे आले याचा शोध घेऊन तत्काळ दुरुस्त करून शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल, अशी प्रतिक्रीया नपंचे पाणीपुरवठा सभापती शैलेंद्र दप्तरी यांनी दिली.
 
worms in Water Supplyसेलू शहरात गत काही महिन्यापासून नवीन नळ योजनेची कामे सुरू आहे. त्यात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अजूनही बरेच काम बाकी असल्याचे सांगितल्या जाते. पण, एका ठिकाणी जरी लिकेज झाले तरी दूषित पाणी पाइप लाइनमध्ये दूरवर पसरत असते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, हे तेवढेच खरे.