नागपूर,
reshimbagh bridge शहरभर विकासकामांना वेग आला असून नागपूरचे रूप दिवसेंदिवस अधिक सुंदर होताना दिसत आहे. येत्या काही वर्षांत नागपूर अधिक आकर्षक आणि आधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल, यात शंका नाही. याचाच प्रत्यय रेशीमबाग चौक ते उमरेड रोडदरम्यान उभारण्यात येत असलेल्या पुलाखाली पाहायला मिळत आहे.
पुलाच्या पिलर्सवर करण्यात आलेले आकर्षक चित्रण नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटपटू उमेश यादव यांचे साकारलेले चित्र विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. हे चित्र इतके जिवंत वाटते की, जणू उमेश यादव प्रत्यक्ष समोर येऊन चेंडू टाकणार आहेत, असा भास पाहणाऱ्यांना होत आहे. हे सुंदर चित्रण नागपूरच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.
सौजन्य: सारंग टोपरे, संपर्क मित्र