7 वर्षीय अजिंक्य फटाळेचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
‘जिनियस इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड 2026’ ने गौरव

वणी, 
Ajinkya Phatale जिद्द, जिज्ञासा आणि ज्ञानाची अखंड ओढ असेल तर वय यशाच्या आड येत नाही, याची प्रचिती वणीतील अवघ्या सात वर्षीय अजिंक्य प्रवीण फटाळे याने आपल्या कर्तृत्वातून दाखवली. खगोलशास्त्र विषयातील असामान्य ज्ञानाच्या बळावर त्याने केवळ वणीच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
 
 
Ajinkya Phatale
 
वणी येथील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाèया अजिंक्यने सौरमाला आणि अंतराळ प्रणालींवरील तब्बल 125 कठीण प्रश्नांची उत्तरे 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत अचूक देत आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेची छाप पाडली. सूर्यापासून ग्रहांचे अंतर, पृथ्वीपासून सूर्याचे अंतर, ग्रहांचे व्यास, तसेच विविध ग्रहांवरील दिवस आणि वर्षांचा कालावधी यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची त्याने सहज व अचूक उत्तरे दिली.
 
 
अजिंक्यच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’ने 28 एप्रिल 2026 रोजी त्याच्या नावाची विक्रम नोंद केली. त्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद येथील जिनियस फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाèया प्रतिष्ठेच्या ‘जिनियस इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड 2026’साठी देशभरातील 173 बुद्धिमान विद्यार्थ्यांमधून अंतिम 50 मध्ये स्थान मिळवत त्याने हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. अजिंक्यच्या यशामुळे वणी शहरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या कर्तृत्वाने विज्ञान, संशोधन आणि ज्ञानार्जनाची आवड जोपासणाèया विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.