'तारक मेहता’च्या सेटवर ढसाढस रडला बाघा

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Bagha cried on the sets of 'Taarak Mehta' ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर नुकताच एक अत्यंत भावनिक प्रसंग घडला. मालिकेत ‘बाघा’ ही भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारिया शूटिंगदरम्यान अचानक भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. त्याची अवस्था पाहून सेटवरील वातावरण काही काळासाठी स्तब्ध झाले.एका महत्त्वाच्या सीनचे शूटिंग सुरू असताना तन्मय अचानक आईच्या आठवणीत हरवला. भावनांचा बांध फुटल्याने तो सेटवरच ढसाढसा रडू लागला. ही परिस्थिती पाहताच निर्माते असित मोदी यांनी तातडीने शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तन्मयजवळ जाऊन त्याला धीर दिला आणि शांत करण्याचा प्रयत्न केला.
 
Taarak Mehta
तन्मयसाठी ‘बाघा’ ही भूमिका केवळ अभिनयापुरती मर्यादित नव्हती, तर त्याच्या आयुष्यातील एक भावनिक अध्याय ठरली होती. त्याच्या आईला ही भूमिका विशेष आवडायची. प्रत्येक भाग ती आवर्जून पाहायची आणि मुलाच्या अभिनयाचे मनापासून कौतुक करायची. मात्र आता त्याच्या यशाचे क्षण पाहण्यासाठी आई सोबत नसल्याची जाणीव तन्मयला असह्य झाली.या प्रसंगामुळे सेटवरील इतर कलाकार आणि क्रू सदस्यही भावूक झाले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सर्वांनी मिळून तन्मयला आधार देण्याचा प्रयत्न केला. हा भावनिक क्षण आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून चाहतेही तन्मयला धीर देत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राने घराघरात वेगळी ओळख निर्माण केली असून ‘बाघा’ हे पात्रही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे.