टेलिग्रामवर बंदी कायम!

दिल्ली हायकोर्टाचा मोठा झटका

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Ban on Telegram दिल्ली उच्च न्यायालयाने टेलिग्रामला मोठा धक्का देणारा निर्णय दिला आहे. नीट यूजी पुनर्परीक्षांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लागू केलेल्या तात्पुरत्या बंदीविरोधात टेलिग्रामने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे २२ जूनपर्यंत टेलिग्रामवरील बंदी कायम राहणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानेशुक्रवारी दिला. न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या एकल खंडपीठाने केंद्र सरकारच्या निर्णयाला मान्यता देत टेलिग्रामची बाजू ग्राह्य धरली नाही.
 
 
Ban on Telegram
 
केंद्र सरकारने नीट यूजी पुनर्परीक्षेदरम्यान पेपर लीक आणि गैरप्रकार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून टेलिग्रामवर तात्पुरती बंदी लागू केली होती. परीक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती आणि अफवा पसरू नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, टेलिग्रामकडून या बंदीला विरोध करत न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने सरकारच्या भूमिकेला दुजोरा देत विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. त्यामुळे आता २२ जूनपर्यंत टेलिग्रामवरील निर्बंध कायम राहणार आहेत. या निर्णयामुळे परीक्षांदरम्यान डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापराबाबत केंद्र सरकार अधिक सतर्क असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.