वाशीम जिल्ह्याकरीता १५३ अतिरीक्त रोहीत्र उपलब्ध

आ. भावना गवळी यांच्या मागणीला यश

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
वाशीम, 
bhavana-gawali : आकांक्षित असलेल्या वाशीम जिल्ह्याकरीता १०० केव्हीए चे २०० अतिरिक्त रोहीत्र मंजुर करण्यात यावे अशी मागणी आ. भावना गवळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली होती. त्यापैकी १५३ रोहीत्र उपलब्ध झाल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता प्रवीण परदेशी यांनी दिली.
 
 
 
j
 
 
 
आकांक्षित असलेल्या वाशीम जिल्ह्यात कुठलेही मोठे उद्योग नसल्याने शेतकर्‍यांना पारंपारीक शेती शिवाय पर्याय नाही. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे जिवनमान शेतीवर अवलंबून आहे. गत खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला. उत्पादनात घट झाली तर शेतमालाला भावही नाही. वाशीम जिल्ह्यातील शेतकर्‍याकडुन मोठ्या प्रमाणात विजेची मागणी होत असल्याने कृषी वाहीन्यावर विजेचा दाब वाढल्याने विद्युत रोहीत्रात वारंवार बिघाड होतांना दिसून येते. त्यामुळे कृषी पंपाकरीता अखंडीत वीज पुरवठा मिळण्याकरीता व महावितरण कपंनीला रोटेशन मेंटनेस करण्याकरीता १०० केव्हीएच्या २०० रोहीत्राची अत्यंत आवश्यकता आहे, अशी मागणी आ. भावना गवळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविण यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री यांनी सदर प्रकरणी तात्काळ लक्ष घालुन वाशीम जिल्ह्याला अतिरीक्त रोहीत्र उपलब्ध करुन देण्याच्या सुचना महावितरणला दिल्या. महावितरणने १०० केव्हीए चे १५० व २०० केव्हीएचे ३ असे एकूण १५३ विद्युत रोहीत्र वाशीम जिल्ह्याला उपलब्ध करुन दिले आहेत.
 
 
ग्राहकांना अखंडीत विज पुरवठा द्या : आ. गवळी
 
 
वाशीम जिल्ह्यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात विज वाहीन्यामध्ये मध्ये कमीत कमी तांत्रीक बिघाड व्हावेत या करीता महातिवरणने मान्सुनपुर्व कामे तातडीने पुर्ण करुन वाशीम जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी नागरिकांना अखंडीत वीज पुरवठा देण्याकरीता महातिवरणने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्याला १०० केव्हीए चे १५० व २०० केव्हीएचे ३ असे एकुण १५३ विद्युत रोहीत्र मिळाले असून, उर्वरीत रोहीत्र जिल्हा वार्षीक योजनेतून देण्यासंदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करणार आहे, असे आ. गवळी यांनी यावेळी सांगीतले.