बिलावल भुट्टोची भारताला थेट युद्धाची धमकी

सिंधू जल करारावरून पाकिस्तानचा पुन्हा तीळपापड

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
इस्लामाबाद
india -pakistan  आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पाकिस्तानच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या आहेत. ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत,’ हा भारताचा स्पष्ट संदेश असून, पाकिस्तानला सिंधूचे पाणी हवे असेल तर त्यांनी आधी सीमापार दहशतवाद थांबवावा, अशी भारताची अट आहे. या कोंडीमुळे हताश झालेल्या पाकिस्तानने आता जुन्याच पोकळ धमक्या देण्यास सुरुवात केली असून, भारताने पाणी रोखल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा दावा इस्लामाबादने केला आहे.
 
bilawal bhutto
 
india -pakistan  इराण-अमेरिका करारानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, सिंधू जल कराराबाबत भारताकडे सातत्याने गयावया करणाèया पाकिस्तानने आता थेट प्रक्षोभक भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अत्यंत कठोर पाऊल उचलत सिंधू जल करार स्थगित केला होता. या घटनेला जवळपास १४ महिने उलटून गेल्यानंतर आता पाकिस्तानकडून धमक्यांचा सूर आळवला जात आहे. शाहबाज शरीफ सरकारच्या मंत्रिमंडळाचा भाग असलेले पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये बोलताना भारतावर थेट आरोप केले. नदीच्या पाण्यातील आमच्या कायदेशीर हक्कांवर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. पाकिस्तान आपल्या हक्कासाठी लढा देईल आणि पाण्याचा प्रवाह रोखण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे बिलावल भुट्टो म्हणाले.
 
india -pakistan  बिलावल भुट्टो यांनी यापूर्वीही नद्यांमध्ये रक्त वाहण्यासारखी प्रक्षोभक विधाने केली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात नदीच्या पाण्याच्या वाटपाचे नियमन करण्यासाठी 1960 मध्ये सिंधू जल करार झाला होता. मात्र, भारताने हा करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. यामुळे प्रचंड संतापलेल्या इस्लामाबादने भारताच्या या कारवाईला ‘युद्धाची कृती’ असे संबोधले आहे.