मोहरमनिमित्त मोठा ताजबाग येथे रक्तदान शिबिर उत्साहात

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नागपूर,
blood donation camp मानवी जीवनात दानाला अत्यंत महत्त्व असून त्यामध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे गौरवोद्गार श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी काढले. मोहरमनिमित्त मोठा ताजबाग येथे हजरत इमाम हुसैन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षीप्रमाणे फैजान-ए-ताजुल औलिया ओल्ड एज होमच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर उत्साहात पार पडले.
 
blood donation camp
या वेळी बोलताना ज्ञानेश्वर रक्षक यांनी सांगितले की, अन्नदान आणि धनदानामुळे तात्पुरत्या गरजा भागतात, मात्र ज्ञानदान आणि रक्तदानातून अनेक जीव वाचवता येतात. रक्तदान करताना कोणताही भेदभाव न करता फक्त मानवता हीच जात मानली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) पथकाद्वारे रक्तसंकलन करण्यात आले. युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. १८ वर्षीय सुभान इमरान हुसैन यांनी पहिल्यांदाच रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले.
कार्यक्रमाला फैजान-ए-ताजुल औलिया ओल्ड एज होमचे प्रमुख बदरूजा इरशाद मौलाना, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे सचिव ताज अहमद राजा, मनपाचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, एआयएमआयएमचे गटनेते शकील पटेल, गुरुदेव सेवा मंडळाचे रामराव चोपडे, रुग्णसेवा समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भोसले तसेच समाजसेवक विक्रम लांजेवार, संदीप महाकाळकर, प्रफुल्ल भोसले, डॉ. निखिल भुते, इमरान हुसैन आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी फैजान-ए-ताजुल औलियाचे कार्यकर्ते मोहसिन खान, सिकंदर शेख, शोएब अहमद, मोहम्मद समीर, इमरान खान, जुबेर सूर्या आणि मोहम्मद फैज यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र