ज्येष्ठांसाठी स्वतंत्र न्यायालयाची मागणी

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नागपूर,
senior citizens ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी देशात स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अविनाश तेलंग यांनी केले. हनुमान नगर येथील विरंगुळा केंद्रात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जनजागृती दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश तेलंग होते.
 
senior citizens
 
या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून माजी न्यायमूर्ती मीरा खडक्कार उपस्थित होत्या. तसेच डॉ. दीपक शेंडेकर, हेमंत शिंगोटे आणि सुधीर सांगोले यांनीही मार्गदर्शन केले. वक्त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर होणारे अन्याय, मानसिक व शारीरिक शोषण तसेच छळाच्या घटनांविरोधात समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.
 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजश्री अंबारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाम पातुरकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोहन झरकर, विनोद व्यवहारे, उल्हास शिंदे, मधुमटके, राजाभाऊ अंबारे, अनिल पात्रीकर, सुधीर पौनीकर, ईश्वर बानकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. मोठ्या संख्येने नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
 
सौजन्य: दीपक शेंडेकर, संपर्क मित्र