आता देवालाही हवे ‘हायटेक’ दान!

वृंदावन मंदिरात डिजिटल सिस्टम सुरू

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
वृंदावन,
Digital system at Vrindavan temple वृंदावनमधील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिर येथे भाविकांच्या दान प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. दररोज हजारो ते लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने दानपेटीतील पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने हायटेक प्रणाली लागू केली आहे. अलीकडच्या काळात विविध धार्मिक स्थळांवर झालेल्या दानचोरीच्या घटनांचा विचार करून मंदिर प्रशासनाने आता ऑनलाइन दानावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरातील दानपेट्यांवर क्यूआर कोड लावण्यात आले असून भाविक थेट मोबाईलद्वारे स्कॅन करून दान करू शकतात. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने मंदिर कार्यालयात डिजिटल पेमेंट मशीनही बसवण्यात आली आहे.
 
dfs5767 
 
दानचोरीच्या घटनांना आळा बसणार
मंदिर व्यवस्थापनाच्या मते, याआधीही दान प्रक्रियेत अनियमितता आणि चोरीच्या काही घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली ही नवी प्रणाली लागू करण्यात आली आहे. आता दानाची रक्कम थेट मंदिराच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने पारदर्शकता वाढणार आहे. भाविकांना ऑनलाइन दानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मंदिर परिसरात पोस्टर्स लावले जाणार असून सुरक्षा कर्मचारीही मार्गदर्शन करणार आहेत. सध्या अनेक भाविक क्यूआर कोडद्वारे दान करत असल्याने रोख दानाचे प्रमाणही कमी झाले आहे. या नव्या डिजिटल व्यवस्थेमुळे मंदिर प्रशासनाला दान प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्यास मदत होणार आहे, तसेच भाविकांनाही सुलभ आणि आधुनिक सुविधा मिळणार आहेत.
 
वृंदावनमधील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिर येथे भाविकांच्या दान प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. दररोज हजारो ते लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने दानपेटीतील पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने हायटेक प्रणाली लागू केली आहे. अलीकडच्या काळात विविध धार्मिक स्थळांवर झालेल्या दानचोरीच्या घटनांचा विचार करून मंदिर प्रशासनाने आता ऑनलाइन दानावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरातील दानपेट्यांवर क्यूआर कोड लावण्यात आले असून भाविक थेट मोबाईलद्वारे स्कॅन करून दान करू शकतात. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने मंदिर कार्यालयात डिजिटल पेमेंट मशीनही बसवण्यात आली आहे.