कात्रज चौकातून वाहने घेऊन जाताय? तर थांबा

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
पुणे
Katraj Chowk कात्रज चौक ते राजस सोसायटी दरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या सेगमेंट लॉचिंग कामाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून (दि. १९) हे बदल लागू करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत ते कायम राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे.
 

Katraj Chowk traffic diversion Pune 
उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीचा ताण व्यवस्थीत विभागता यावा आणि कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळता अन्य सर्व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.नव्या नियोजनानुसार कात्रजकडून कोंढव्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कात्रज चौकातील राजस सोसायटीजवळील पुलाचा वापर टाळून शेजारील सेवा रस्त्याचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच राजस सोसायटी परिसरातील पुलावर कात्रज ते कोंढवा दरम्यान एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.
कात्रज तलाव परिसरातून येणाऱ्या वाहनांनी राजस सोसायटी चौकातून पुढे मार्गक्रमण करावे, तर कोंढव्याकडे जाणाऱ्या वाहनांनी डावीकडे वळून सेवा रस्त्याचा वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय राजस सोसायटीकडून कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांनी कपिल Katraj Chowk  डेअरी परिसरातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी दिली आहे.उड्डाणपुलाचे काम सुरळीत आणि सुरक्षितरीत्या पूर्ण व्हावे यासाठी वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाहतुकीतील हे तात्पुरते बदल प्रवाशांच्या सोयीसाठी आणि कामाच्या गतीसाठी आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.