परिचारीकांभोवती फिरतो ‘भारत भाग्य विधाता’

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
वर्धा,
Manoj Tapadia जीवन आणि मृत्यू या दोन्ही आघाड्यांवर काम करणार्‍या परिचारीकांविषयी अनेकदा राग व्यत केल्या जातो. परंतु, त्या जी सेवा करतात ती सेवा दुसरे कोणीही करू शकत नाहीत. २६/११ च्या बॉम्बहल्ल्यात परिचारिकेची भूमिका किती महत्त्वाची होती हे आपण सर्वांनी अनुभवले आहे. त्यामुळेच एक संवेदनशील विषय हाती घेत भारत भाग्य विधाता या हिंदी चित्रपटाची पटकथा लिहिली, अशी माहिती प्रसिद्ध पटकथा लेखक मनोज तापडीया यांनी दिली.
 
 

Manoj Tapadia
वर्धेत आपल्या भारत भाग्य विधाता या चित्रपटाच्यानिमित्ताने माहेश्वरी समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमापूर्वी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमानंद तापडिया, युवा समाजसेवक प्रदीप बजाज, नंदकिशोर भुतडा, ऋषभ जाज, मुरली केला यांची उपस्थिती होती.
 
ते पुढे म्हणाले की, ’भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर आधारित असला तरी, त्याच्या सादरीकरणाची पद्धत इतर चित्रपटांपेक्षा वेगळी आणि अत्यंत संवेदनशील आहे. बहुतेक चित्रपट ही घटना पोलिस आणि दहशतवादाच्या दृष्टिकोनातून चित्रित करतात. भारत भाग्य विधाता या चित्रपटात कामा हॉस्पिटलमधील त्या धाडसी परिचारिका, डॉटर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचे शौर्याची कथा आहे. ज्यांनी शेकडो रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली. चित्रपटाचा पूर्वार्ध मनोरंजन आणि हलयाफुलया विनोदाने भरलेला आहे, तर उत्तरार्ध प्रेक्षकांना भावनिकरित्या हेलावून टाकतो. संवाद, अभिनय आणि Manoj Tapadia  दिग्दर्शन प्रेक्षकांना माणुसकी, कर्तव्य आणि शौर्याचा खरा अर्थ शिकवतात, असे ते म्हणाले. लेखक दोन प्रकारचे असतात. त्या पैकी आपण आशावादी लेखकांमध्ये मोडतो. निराशावादी लेखन करणारेही लेखक आहेत. आपण मात्र, परिचारिकांविषयी संवेदना आणि सहिष्णू भावनेतून पटकथा लिहिली, असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्याला गितकार व्हायचे होते. त्यासाठी मुंंबई गाठली. परंतु, या प्रवासात आपण पटकथा लेखक झालो. लाईफबॉय सारख्या १५० पेक्षा जास्त जाहिरातीही केल्या. २००५ मध्ये चिनीकम चित्रपटची कथा लिहिली. अनेकांचे आयुष्य निघून जातं. आपला हा प्रवास २० वर्षांचा आहे. त्यात ही कहाणी प्रेक्षकांना आवडली आहे. कंगणा राणौत या अभिनेत्रीने ५ दिवसात काम करण्यासाठी होकार दिला. ४५ दिवसात काम पूर्ण करावे लागले. हे आपल्यासाठी आव्हान होते. या चित्रपटाच्या पटकथेकरिता पत्रकारांनीही आपल्याला मदत केली असल्याचा आवर्जुन उल्लेख त्यांनी केला. संचालन राजकुमार जाजू यांनी केले.