डॉ. राहुल खराबे यांची गव्हर्निंग कौन्सिलवर बिनविरोध निवड

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Dr Rahul Kharabe राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे व्यवसाय व्यवस्थापन व वाणिज्य विभागप्रमुख डॉ. राहुल खराबे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (मासिया)च्या गव्हर्निंग कौन्सिलवर बिनविरोध निवड झाली आहे. राज्यातील व्यापारी व उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च निर्णयप्रक्रियेत विदर्भाला प्रथमच प्रतिनिधित्व मिळाल्याने ही निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
 

MASSIA Governing Council, Dr Rahul Kharabe, 
मुंबई येथे पार पडलेल्या मासियाच्या द्विवार्षिक निवडणुकीत नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र मानगावे यांच्यासह डॉ. खराबे यांची गव्हर्निंग कौन्सिल सदस्य म्हणून निवड करण्यात आली. राज्यातील वाणिज्य, उद्योग आणि व्यवसाय क्षेत्राच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये या कौन्सिलची महत्त्वपूर्ण भूमिका असते.'गाव तेथे उद्योजक' या मासियाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सक्रिय सहभागी असून, या संदर्भात दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करारही करण्यात आला आहे. डॉ. खराबे यांच्या निवडीमुळे नागपूरDr Rahul Kharabe  व विदर्भातील व्यापारी, उद्योजक तसेच व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित प्रश्न राज्यस्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.या निवडीबद्दल कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मेधा कानेटकर यांनी डॉ. राहुल खराबे यांचे अभिनंदन केले.