नागपुरातील मोहम्मद हमीदला मध्यप्रदेश पोलिसांनी केली अटक

जातीय सलोखा बिघडविण्याच्या कटाचा आरोप

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Mohammad Hamid arrest बकरी ईदच्या दिवशी सामूहिक गोवंश वध करून धार्मिक वातावरण बिघडविण्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या नागपूरच्या गांधीबाग परिसरातील रहिवासी मोहम्मद हमीद उर्फ इंजिनिअर (वय ६९) याला मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कोतवाली पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात त्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. मात्र, त्यानंतर प्रशासनाने त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत कारवाई करत त्याला नागपुरातून ताब्यात घेतले.
 

Mohammad Hamid arrest 
पोलिसांच्या माहितीनुसार, मोहम्मद हमीद याच्यावर सिवनी येथे धार्मिक सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने गोवंश वधाची योजना आखल्याचा आरोप आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने त्याच्याविरोधात एनएसए अंतर्गत कारवाई केली. अटकेदरम्यान आरोपीने पोलिसांना सहकार्य न करता विरोध केल्याचेही सांगण्यात आले आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी त्याला नागपुरातून सिवनी येथे आणले. त्यानंतर त्याची रवानगी जबलपूर केंद्रीय कारागृहात करण्यात आली. या अटकेमुळे मोहम्मद Mohammad Hamid arrest हमीद उर्फ इंजिनिअर पुन्हा चर्चेत आला आहे. मार्च २०२५ मध्ये नागपुरातील महाल परिसरात झालेल्या दंगलीत त्याचे नाव समोर आले होते. त्या वेळी नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्यावर हिंसाचार भडकविणे आणि सामाजिक वातावरण बिघडविण्याचे आरोप करण्यात आले होते.