नीट पुनर्परीक्षेसाठी एनटीएकडून कडक नियमावली जाहीर

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली
neet re-examination राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) २१ जून २०२६ रोजी आयोजित केलेल्या ‘नीट-युजी’ पुनर्परीक्षेसाठी नियमावली अधिक कडक केली आहे. परीक्षा केंद्रांवर होणारी गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था, बायोमेट्रिक पडताळणी आणि विद्यार्थ्यांच्या पेहरावाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जाईल, ज्यानंतरच त्यांची बायोमेट्रिक ओळख पटवली जाईल, असे ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे. ही परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५  या वेळेत पार पडणार आहे.
 
neet exam
 
neet re-examination बायोमेट्रिक प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक बिघाड, सर्व्हरची समस्या किंवा डेटा न जुळल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले जाणार नाही. अशा परिस्थितीत संबंधित उमेदवाराला परीक्षा केंद्रावरच एक लेखी हमीपत्र (डिक्लेरेशन फॉर्म) द्यावे लागेल, ज्यानंतर त्याला परीक्षेला बसू दिले जाईल. कोणत्याही विद्यार्थ्याला बायोमेट्रिक पडताळणीच्या नावाखाली त्रास दिला जाणार नाही, अशी ग्वाही ‘एनटीए’ने दिली आहे. आवश्यक वाटल्यास ही पडताळणी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किंवा पेपर संपल्यानंतरही पूर्ण केली जाऊ शकते.

धार्मिक पेहरावाला परवानगी
neet re-examination दरम्यान, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी हलके आणि साधे कपडे परिधान करावेत, असा सल्ला देण्यात आला आहे. धार्मिक चिन्हे, हिजाब, फेटा किंवा जानवे घालून येणाèया विद्यार्थ्यांना परवानगी दिली जाईल. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्यांना तपासणीसाठी केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहावे लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये केवळ एक पारदर्शक पाण्याची बाटली आणि पारदर्शक प्लास्टिक पाऊचमध्ये हॉल तिकीट घेऊन जाण्याची मुभा असेल. दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार अतिरिक्त वेळ दिला जाणार असून, त्यांच्यासाठी परीक्षा सायंकाळी ६.२० वाजेपर्यंत सुरू राहील.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंना पूर्णपणे बंदी
neet re-examination तथापि, परीक्षा केंद्रावर मोबाईल, स्मार्टवॉच, ब्लूटूथ किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणण्यास सक्त मनाई आहे. याशिवाय मोठे बकल्स असलेले बेल्ट, जड दागिने आणि धातूच्या वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी चप्पल किंवा कमी टाचेचे बूट घालावेत. उंच टाचेचे बूट घालणाèयांची अधिक सखोल तपासणी केली जाईल. दरम्यान, कोणत्याही वैध कारणाशिवाय बायोमेट्रिक पडताळणी करून घेण्यास नकार देणे हा नियमांचा भंग मानला जाईल आणि अशा विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असेल, असा इशारा ‘एनटीए’ने दिला आहे.