काव्य संग्रहातील प्रत्येक कविता अंतर्मुख पाहणारी : आ. खोडे

चतुरंग काव्य संग्रहाचे प्रकाशन

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
मंगरूळनाथ,
shyam-khode : चतुरंग हा केवळ काव्यसंग्रह नसून समाजातील विविध भावभावना, विचार, नाती आणि वास्तवाचे प्रतिबिंब आहे.या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता रसिकांना विचार करायला लावणारी आणि अंतर्मुख करणारी आहे, असे मत आमदार श्याम खोडे यांनी काव्य संग्रह प्रकाशन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.
 
 
 
shyam
 
 
 
येथील जून्या पंचायत समिती सभागृहात साहित्य, काव्य आणि सामाजिक जाणीवांचा संगम असलेल्या चतुरंग काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा आमदार श्याम खोडे यांचे हस्ते, प्रा. मनोहर बनसोड यांचे अध्यक्षतेत भाजपा जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम चितलांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत १८जून रोजी संध्याकाळी उत्साहात पार पडला. याप्रसंगी भाजपा मंडळ अध्यक्ष सुदर्शन धोटे, शहर अध्यक्ष अभिषेक दंडे, डॉ. दिलीप रत्नपारखी, नगरसेवक विरेंद्र ठाकूर, राजू जयस्वाल, श्रीहरी इंगोले, दिपक राऊत, भाजपा वाशीम शहर अध्यक्ष मनिष मंत्री, माजी नगराध्यक्ष राजेंद्र राठी, सुनिल मालपाणी, राजेंद्र महल्ले, प्रा.संजय कावरे, गौतम कोकरे, रशीद शादा यांची उपस्थिती प्रमुख उपस्थिती होती.
 
 
आजच्या धकाधकीच्या युगात साहित्य माणसाला माणुसकीशी जोडण्याचे कार्य करते. चतुरंग या काव्य संग्रहातील सर्व कवींनी आपल्या अनुभवांना आणि भावविश्वाला शब्दरूप देऊन मराठी साहित्याची समृद्धी वाढविली. या काव्यसंग्रहाच्या निर्मितीत योगदान देणार्‍या सर्व कवी,संपादक आणि आयोजकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.चतुरंग काव्यसंग्रह व रसिकांच्या मनात निश्चितच आपले वेगळे स्थान निर्माण करेल, असा विश्वास प्रा.मनोहर बनसोड यांनी व्यक्त केला.
 
 
कार्यक्रमाचे संचालन सुधीर घोडचर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र महल्ले यांनी केले. नव कवींनी विविध कविता सादर करून रसिकांची मने जिंकली व भरपूर दाद मिळवली. रसिकांच्या उपस्थितीमुळे सभागृह खचाखच भरलेले होते उपस्थितांना प्रत्येकी एक काव्य संग्रह भेट देण्यात आला.