एकाच रात्रीत पाच सशस्त्र दरोडे

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
पुणे,
robbery gang पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच रात्रीत पाच ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत टोळीतील तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे २५ लाख रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे तब्बल २० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
 

 Pune rural police, inter district robbery gang, 
मागील काही महिन्यांपासून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दौंड, बारामती, जेजुरी, जुन्नर, माळेगाव आणि आळेफाटा परिसरात जबरी चोरी व दरोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. विशेषतः १० जून रोजी दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रात्रीत चार ठिकाणी आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि दौंड पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना करून तपास सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास पथकाने अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांमध्ये छापेमारी केली. या कारवाईत गणेश मंगेश काळे, विशाल हंबरड्या काळे आणि किशोर रावण भोसले या आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी प्रवीण उर्फ पप्पू भोसले आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
 
टक करण्यात आलेल्या आरोपींकडून सुमारे २७ तोळे सोन्याचे दागिने, ३२४ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच इतर चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याविरोधात विविध जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
 
 
या कारवाईमुळे पुणे ग्रामीण robbery gang  परिसरातील दरोडे, घरफोड्या आणि जबरी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळीचे जाळे उघड झाले आहे. पोलिसांनी उघडकीस आणलेल्या २० गुन्ह्यांमुळे अनेक प्रलंबित प्रकरणांचा तपास मार्गी लागला असून नागरिकांमध्ये दिलास्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून या टोळीशी संबंधित आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.